जिल्ह्यात तिघांनी आत्महत्या करून संपविले जीवन...

Foto

औरंगाबाद: वाळूज औद्योगिक नगरीत विविध घटनेत महिला व पुरुषाने तर वैजापूर येथील सटाणा गाव येथे एका तरुणाने आत्महत्या केली असल्याची घटना आज समोर आली आहे. एकाच दिवशी जिल्ह्यात तीन जणांनी आत्महत्या केल्याने  हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

अरुणा सोमनाथ डव्हाळे वय २० (रा.म्हाडाकॉलोनी, तासगाव) या महिलेने राहत्याघरी ओढणीच्या साहाय्याने छताच्या पाईप ला गळफास घेत आत्महत्या केली तर संजय रमेश शिंदे वय-३७(फुलेनगर, पंढरपूर) यांनी ओढणीच्या साहाय्याने घराच्या लाकडी बली ला  गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली आहे. या दोन्ही घटने प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.दोन्ही घटनेतील आत्महत्येचे करण मात्र गुलदस्त्यातच आहे पोलीस पुढील तपास करीत आहे. तर तिसरी घटना वैजापूर तालुक्यातील आहे.

सागर जाधव वय-२१(रा.सटाणा वैजापूर) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे या प्रकरणी अधिक महिती अशी की,  मृत सागर हा तरुण शेतकरी आहे.घरच्या सोबत शेतीकाम करून तो उदरनिर्वाह करायचा. २३ जुलै रोजी त्याने विषारी औषधी चे सेवन केल्याने तो अस्वस्थ झाला होता. ही बाब घरच्यांच्या लक्षात येताच त्यांनी त्यास तातडीने वैजापूर येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले होते तेंव्हा पासून त्यावर उपचार सुरू होते. उपचार सुरू असताना त्याचा आज सकाळी साडे सात वाजेच्या सुमारास मृत्यू झाला  या प्रकरणी वैजापूर पोलीस ठाण्यात  अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

एकाच दिवशी जिल्ह्यात तीन आत्महत्या झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker